Type Here to Get Search Results !

बीजमातेच्या गावी शिक्षणाचे दान; पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप!*

 


अकोले, प्रतिनिधी : 

राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्चाला फाटा देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने कोंभाळणे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कपडे, घड्याळे व गोड खाऊचे वितरण करण्यात आले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी बोलताना बीजमाता राहीबाई पोपरे यांनी सांगितले की, विखे परिवाराने गेल्या चार पिढ्यांपासून समाजाला देण्याची परंपरा जपली आहे. वाढदिवसानिमित्त फुलांचे गुच्छ, सत्कार व अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा उपक्रम समाजासाठी आदर्शवत आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून शिक्षणाला बळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.


जगभरात बियाणे संवर्धनाचे महत्त्व पोहोचविणाऱ्या बीजमातेच्या पावन भूमीत शिक्षणाचे हे कार्य होत असल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला. कोंभाळणे परिसरातील काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातील शाळांमधून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्याची बाब विशेष कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.



महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गेली पंचवीस ते सव्वीस वर्षे पत्रकारिता करत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना कायम मनात आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून ज्ञानमंदिरात विद्यार्थ्यांच्या रूपाने भविष्यातील सक्षम नागरिक घडत असतात. विद्यार्थ्यांना दिलेली एक वही, एक पेन किंवा एक दप्तरदेखील त्यांच्या भवितव्याला दिशा देणारे ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे ५१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे वितरण करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सातत्याने करत असल्याचे डॉ. आरोटे यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक उगले, जि प शाळा कोंभाळने 

1)श्रीम.शोभा लांडगे मॅडम 

2)बाळासाहेब बांबळे सर 

2)परते सर 


जि प शाळा पोपेरेवाडी 

1)अमोल भोईर सर 

2)किरण कटके सर 


जि प शाळा ठाकरवाडी 

1)दत्तात्रय सहाणे सर 

2)सुजाता कवडे मॅडम

, शिक्षक, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments