*नाशिक (विशेष प्रतिनिधी):*
संगमनेर तालुक्यातील म्हाळुंगी पूल ते रा.मा. ६० बोगदा (प्रजिमा-२१) रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण व रुंदीकरण कामात झालेला प्रचंड भ्रष्टाचार आणि प्रशासकीय मुजोरी विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आंबेडकर पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष *शशिकांत दारोळे* यांचे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिकच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर सुरू असलेल्या 'अन्नत्याग' आमरण उपोषणाचा आज तीसरा दिवस आहे.
*मा. मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; गृह विभागाला चौकशीचे आदेश:*
उपोषणकर्ते शशिकांत दारोळे यांनी पुराव्यांसह पाठवलेल्या ई-मेलची *मा. मुख्यमंत्री सचिवालय (CMO)* आणि *स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित ठेकेदार कंपन्यांनी इस्टिमेट व वर्कऑर्डरच्या तांत्रिक नियमांचे उघड उल्लंघन केल्यामुळे आणि मुदत संपूनही अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई न केल्यामुळे, मुख्यमंत्री कार्यालयाने ही फाईल पुढील कडक कायदेशीर व फौजदारी चौकशीसाठी *'गृह विभाग' (अपर मुख्य सचिव, मनीषा मिलिंद म्हैसकर)* यांच्याकडे वर्ग केली आहे. थेट मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाला चौकशीचे आदेश दिल्यामुळे नाशिक आणि संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारी अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.
*संगमनेर ते नाशिक: प्रशासकीय फसवणुकीचा इतिहास:*
हा लढा दीर्घकाळापासून सुरू असून, आजपर्यंत केलेल्या अनेक तक्रारींच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट अधिकाऱ्यांनी केवळ दोषींना पाठीशी घालण्याचे काम केले. यामुळे शशिकांत दारोळे यांना आधी *संगमनेर या ठिकाणी सुद्धा दोन दिवस आमरण उपोषण करण्यास भाग पाडले गेले होते.* त्यावेळी प्रशासनाने एक चुकीचे व खोटे निर्णय पत्र देऊन उपोषणकर्त्याची पूर्णपणे दिशाभूल केली. त्या चुकीच्या पत्रानंतरही प्रत्यक्ष जागेवर कोणतीही दंडात्मक कारवाई न केल्यामुळे, अखेर प्रशासनाच्या या अमानुष फसवणुकीला कंटाळून शशिकांत दारोळे यांना नाशिक येथे मुख्य अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यास भाग पाडले आहे.
*लढ्याचे मुख्य तांत्रिक मुद्दे:*
*संपूर्ण रस्ता निकृष्ट:* रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरण कामात तांत्रिक निकष पूर्णपणे पायदळी तुडवले असून संपूर्ण रस्ता अत्यंत निकृष्ट व बोगस पद्धतीने बांधला आहे.
*इस्टिमेट व वर्कऑर्डरचे उल्लंघन:* संबंधित कंपन्यांनी आणि कंत्राटदारांनी मंजूर इस्टिमेट व वर्कऑर्डरच्या नियमानुसार अजिबात काम केलेले नाही.
*कामाची मुदत संपली:* या प्रकल्पाची अधिकृत कामाची मर्यादा (मुदत) संपलेली असूनही निकृष्ट काम करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत.
*चुकीच्या व बोगस गटारी:* उपोषणाच्या दबावापोटी सध्या जे गटारीचे काम सुरू केले आहे, तेही पूर्णपणे चुकीच्या साईजचे आणि लेव्हल सोडून खाली-वर बांधले जात आहे.
*अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपोषण स्थळी भेट व जाहीर पाठिंबा:*
आज उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला तरी नाशिक PWD मधील स्थानिक अधिकारी साधी विचारपूस करायला आलेले नाहीत. या मुजोरीचा निषेध करण्यासाठी अनेक प्रमुख नेत्यांनी उपोषण स्थळाला प्रत्यक्ष भेट दिली. यामध्ये *RPI नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख मा. अशोकजी गायकवाड*, *नाशिक विधानसभा अध्यक्ष अमितजी सपकाळे*, *RPI नाशिक जिल्हा अध्यक्ष अतुलजी शिंदे* यांनी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
तसेच *ऑल इंडिया पँथर सेना अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष रामदास दारोळे*, *आरपीआय संगमनेर तालुका अध्यक्ष प्रवीण आव्हाड*, *महिला आघाडी अध्यक्ष जयाताई डोळस*, आणि *रमाई महिला प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सचिव सौ. राजवंतीताई दारोळे*, *श्रीकांत काळे* यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून "भ्रष्टाचारी कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाका आणि दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा", अशी आक्रमक मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments