संगमनेर फ्रेंड्स सेवाभावी संस्था संगमनेर यांच्या वतीने दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता सिद्धिविनायक लॉन्स गणपती मंदिरा शेजारी समनापुर रोड संगमनेर येथे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तसेच पदोन्नती मिळालेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरची शान आणि मान असणारे हरहुन्नरी कलाकार पद्मश्री माननीय श्री रघुवीरजी खेडकर हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रानकवी म्हणून सुप्रसिद्ध असणारे कवी माननीय श्री तुकारामजी धांडे यांनी आपल्या राणा कविता आपल्या शैलीत सादर केल्या आणि उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी माननीय रघुवीर जी खेडकर यांनी समाजातील उच्चशिक्षित शिक्षक प्राध्यापक मुख्याध्यापक यांनी माझ्यासारख्या अत्यंत कमी शिकलेल्या एका कलाकाराची दखल घेतली, आणि दाद दिली यामुळे मी खूप भारावून गेलो, असा सत्कार सोहळा म्हणजे समाजामध्ये एक आदर्श घालून देण्याचाच प्रयत्न आहे यामुळे पुढील पिढीला नक्कीच प्रेरणा मिळतील अशी आशा व्यक्त केली. आणि रानकवी श्री तुकाराम जी धांडे यांनी रान कविता आदिवासी कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. आपल्यासारख्या सुशिक्षित वर्गाकडून माझ्यासारख्या दुर्लक्षित आदिवासी कवींना समाजामध्ये योग्य स्थान असेच मिळत राहावे हीच माझी इच्छा आहे अशी श्री धांडे यांनी आशा व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. अशोकरावजी राहींज यांनी संस्था स्थापनेचा उद्देश सांगितला, उपाध्यक्ष मा. प्रा. डॉ. संजय गायकवाड, यांनी संस्थेचा इतिहास आणि भविष्यकालीन नियोजन कसे असेल याबद्दल विवेचन केले, संस्थेचे खजिनदार प्राचार्य श्री दिलीप डोंगरे, सौ विद्या देवकर तसेच प्रा. राम वर्पे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, आणि प्राचार्य अशोकरावजी खेमनर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम प्रसंगी माझी प्राचार्य डी के गायकवाड सर, काळे सर तसेच विविध संस्थेतून सेवानिवृत्त झालेले आणि सध्या कार्यरत असलेले प्राचार्य, प्राध्यापक शिक्षक यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री पोपट कांबळे माननीय श्री उल्हास पवार मा. प्रा. माधव रेवगडे, श्री अण्णा टेमगिरे श्री अशोक पानसरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा राहिंज, इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक मारुती गुंजाळ यांनी आभार मानले आणि कार्यक्रमाचे सांगता झाली.

Post a Comment
0 Comments