----- संघर्ष, जिद्द, सतत धडपडीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे गोरक्ष नेहे हे आज संगमनेर तालुक्यातील पत्रकारितेतील एक विश्वासार्ह नाव बनले आहे. सावरगाव तळ येथील अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या गोरक्ष यांचे बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. दिव्यांगत्वाचे आव्हान आणि घरची हलाखीची नित्य कसरत करायला लावणा-या परिस्थितीत त्यांनी हार न मानता शिक्षण आणि ध्येयाची वाट निवडली.
आईने मजुरी करून संसाराचा गाडा ओढला, तर गोरक्ष यांनी शिक्षण घेत असतानाच हॉटेल, कापड दुकाने आणि हॉस्पिटलमध्ये काम करून स्व खर्च भागवत घराला हातभार लावला संगमनेर महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुणे येथून रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
वर्तमानपत्रे वाटण्यापासून सुरू झालेला प्रवास पुढे लोकमत युवा मंच, दैनिक आनंद, गदर, लोकपत्र, प्रभात, देशोन्नती, पुढारी नवराष्ट आदी वृत्तपत्रांपर्यंत पोहोचला. गेल्या दोन दशकांपासून पत्रकारितेत कार्यरत असलेले गोरक्ष नेहे सध्या नवराष्ट्र दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमातही ते सक्रिय आहेत.
सर्वसामान्यांची प्रश्न, अन्यायग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे , सामाजिक बांधिलकी जपणे, एक संयमी प्रामाणिक वृत्ती ठेवून माणसं जोडण्याच्या कलेने एक मोठा मित्रपरिवार तयार झाला आहे.
त्यांच्या यशामागे पत्नी शीतल नेहे यांची भक्कम साथ असून कुटुंबाचा त्यांना मोठा आधार मिळाला आहे. आमदार अमोल खताळ यांच्याशी असलेले त्यांचे दोन दशकांहून अधिक काळाचे मैत्रीचे नाते आजही तितकेच दृढ आहे. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्यावर जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली असून ती जबाबदारीही ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. अशा दिलदार मेहनती मनमिळावू व्यक्तिमत्त्व असलेल्या गोरक्ष नेहे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment
0 Comments