निगडी : लोकहितवादी सेवा संघ निगडी शाखा अध्यक्ष अनिल मुळवाड आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरानगर, ओटास्कीम, निगडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज बनसोडे, महाराष्ट्र राज्य सचिव विशालभाई वाघमारे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक बाप्पूशेठ घोलप साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक निगडी शाखा अध्यक्ष अनिल मुळवाड यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी लोकहितवादी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अतिश दुधावडे, महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक अजिंक्यभाऊ वाघमारे, कार्यक्रमाचे आधारस्थान निलेशभाऊ कानडे, महाराष्ट्र राज्य संघटक निलेशभाऊ कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते हौसराव शिंदे, सुफियान सय्यद, आभिषेक काळे, विशाल मुळवाड, अरुण मुळवाड, प्रथमेश सावंत, संदीप कदम, अमोल खाडे, गणेश संकपाळ (मोनू), पंकज जाधव, अक्षय रोकडे, अजय रोकडे, आभिषेक रोकडे, सचिन तालडे, केशव काळे आदी सदस्य उपस्थित होते.
ईशा नेत्रालयाचे मार्केटिंग मॅनेजर यशवंत बोऱ्हाडे, प्रथमेश पवार, सानिका निकवरे, ब्रांच मॅनेजर दुर्वाक्षी पाटील मॅडम तसेच मेडिकल डायरेक्टर डॉ. वैभव अवताडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत मोलाची भूमिका बजावली.
सध्या मोबाईल, संगणक व इतर डिजिटल उपकरणांचा वाढता वापर आणि वाढलेला स्क्रीनटाइम यामुळे डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे डोळ्यांची नियमित तपासणी करणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
सामाजिक बांधिलकी जपत लोकहितवादी सेवा संघाने आयोजित केलेल्या या मोफत नेत्र तपासणी शिबिरामुळे अनेक नागरिकांना लाभ मिळाला असून, भविष्यातही अशा आरोग्यविषयक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

Post a Comment
0 Comments