अकोले ( प्रतिनिधी ) तालुक्यातील कळसेश्वर विद्यालय, कळस चा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा 100% निकाल लागला आहे. विद्यालयातून विशेष प्राविण्य मध्ये 10 व प्रथम श्रेणीतून 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून सार्थक गणेश वाकचौरे 85.40 प्रथम, अनुष्का सुनिल आवारी 85.00 द्वितीय, आयुष संजय वाकचौरे 84.80 तृतीय, रोहन बाळासाहेब वाकचौरे 82.80 चतुर्थ, रोशन रावसाहेब वाकचौरे 82.80 चतुर्थ, आयुष नवनाथ वाकचौरे 82.20 पंचम मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सेक्रेटरी शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय शिंदे, शिवाजी आवारी, मच्छिंद्र साळुंखे, गीतांजली खरबस, केशव महाले, मनीषा शिंदे, प्रशांत जाधव, प्रतीक्षा घुले ,कुमार पालवे, सुरेश वाघमारे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment
0 Comments