अकोले प्रतिनिधी:
अकोले तालुक्यातील प्रवरा परिसरातील ह.भ.प. सावित्रीआई माध्यमिक विद्यालय, विठे येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील कु. वैष्णवी हरीदास आरोटे हिने ८१.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर साहिल मदन भागवत याने ७८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. मयुर लक्ष्मण उघडे याने ७३.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
याशिवाय सोहम योगेश आरोटे याने ७२.४० टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक मिळविला असून अदिती किसन आरोटे हिने ७०.६० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच अकोले कन्या विद्यालयातील सेमी इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी कु. छत्रपती विश्वासराव आरोटे याने ७४.६० टक्के गुण प्राप्त केले. अगस्ती विद्यालयातील विद्यार्थी कु. आर्यन नवनाथ आरोटे याने ४५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले.
इयत्ता दहावी व बारावीमध्ये यश मिळविणाऱ्या गावातील सर्व गुणवंत, ज्ञानवंत व बुद्धिवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक, शिक्षक व विद्यालयाचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, शेतकरी व व्यावसायिक संध्या हरीदास आरोटे यांच्या कुटुंबाचेही सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments