संगमनेर खुर्द (संजय गोपाळे)
संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथील
काल सायंकाळी जवळे
कडलग, येथे एका ४ वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात सिद्धेश सुरज कडलग या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला . या दुःखदायक घटनेच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी मृत बालकाच्या कुटुंबीय व ग्रामस्थांची भेट घेतली.
उत्तर नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यात , शेतकऱ्यांचे पशुधन,अनेक लोकांचा बळी जात आहे. कित्येक लहान मुले ,महिला जखमी झाल्याच्या घटना सातत्याने कुठे ना कुठे घडत आहे.
जवळेकडलग येथील ग्रामस्थांनी आम्ही घराबाहेर पडायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
रोज कुठे ना कुठे बिबट्याचे हल्ले सुरूच असून वनविभागाचे अधिकारी, शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी घटनास्थळी भेट देतील व कुटुंबियांचे सांत्वन करतील. परंतु, केवळ सांत्वन करून हा प्रश्न सुटणार नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आणि रेस्क्यू पथकांचे शोधकार्य सुरु आहे, मात्र हा तात्पूरता उपाय आहे. बिबट्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलली पाहिजेत.जिल्ह्यात बिबट्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही, हे अत्यंत निंदनीय आहे. बिबट प्रजनन नियंत्रणात कशा प्रकारे करता येईल, दिवसा थ्री फेज लाईटची सुविधा, आणि या सततच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याची मागणी आम्ही सरकारकडे वेळोवेळी करत आलो असल्याचे खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले ,सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा संतप्त जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
.


Post a Comment
0 Comments