Type Here to Get Search Results !

कृषीकन्या करणार शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन

  


संगमनेर खुर्द (संजय गोपाळे)


                   श्रमशक्ती कृषी महाविद्यालय  मालदाड येथील कृषी कन्यांचे संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला या गावात पुढील तीन महिन्यांसाठी वास्तव्यास असणार असून, येथील शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सरपंच राजेंद्र त्रिभुवन यांनी दिली. या कृषीकन्याचे कसारा दुमाला ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. 

       सेवा संस्कार संस्थेच्या अंतर्गत श्रमशक्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथे ह्या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. संस्थेचे संस्थापक साहेबराव नवले प्राचार्य डॉ. आर .एस. हापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वय प्रो. एन. तायडे कार्यक्रम अधिकारी प्रो. ए.डी. गुंजाळ,

 प्रो. के.शिंदे. यांच्या यांच्या सूचनेनुसार कु. मोरे पूजा ,कु. साबळे ऋचिरा ,कु. गाजरे वृषाली, कु. कानवडे अनुजा, कु. महाजन समृद्धी या कासारा दुमाला येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहे. 

    त्याप्रसंगी सरपंच राजेंद्र त्रिभुवन, ग्रामसेवक सुनील खैरनार व शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments