संगमनेर खुर्द (प्रतिनिधी)–
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने महाविस्तार ए आय ॲपच्या प्रचार प्रसिद्धीसाठी निमगाव बुद्रुक येथील कै. पं.रा. कानवडे कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने नुकतेच विकसित करण्यात आलेले अँड्रॉइड मोबाईल वरील महाविस्तार ए आय ॲप डाउनलोड करून शेतकरी बांधवांना हवामान, पिक सल्ला, आधुनिक तंत्रज्ञान, जमीन मृदा पत्रिका, बाजारभाव, खत गणक, कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी उपाय योजना या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. या ॲप चे वैशिष्ट्य म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट. या चॅटबॉट च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना कृषी विषयक कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर प्राप्त होऊन कृषी विभागाच्या विविध योजना मिळणे सुलभ होणार आहे. अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुधाकर बोराळे साहेब व संगमनेरच्या तालुका कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके यांचे मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी ओंकार यन्नम व सहाय्यक कृषी अधिकारी विजय शेलार यांनी विद्यार्थ्यांना महा विस्तार ए आय डाउनलोड करण्याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी कै. पं.रा. कानवडे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. उद्धव उगले, श्री कढणे सर व श्री गाडेकर सर आदींचे सहकार्य लाभले.
संगमनेर, अकोले, राहता व कोपरगाव तालुक्यातील सर्व गावांमध्ये क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी व उप कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments