Type Here to Get Search Results !

निमगाव खुर्द मध्ये बिबट्याचा कालवडीवर हल्ला...कालवड ठार.

 

संगमनेर खुर्द :संजय गोपाळे 


दिवसेंनदिवस बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दिवसाही बिबट दिसत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी. शेतात काम करणाऱ्या महिला.. शाळेत जाणारे लहान लहान विद्यार्थी याच्या मध्ये प्रचंड भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

तसेच शेतकऱ्याच्या पशुधनावर सुद्धा बिबटे मोठ्या प्रमाणात हल्ले करत आहेत.

निमगाव खुर्द मध्ये मागील 1 महिन्यात 4/5ठिकाणी बिबट्यानी शेतकऱ्याच्या गोठ्यावर हल्ले करून गाई, वासरे,शेळ्या कालवडीवर हल्ले केल्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना काल. संद्याकाळी

 तालुक्यातील निमगाव खुर्द येथील शेतकरी साहेबराव पुंजा कासार यांच्या गोठ्यातील अंदाजे 7 ते 8 महिन्याच्या कालवडीवर बिबट्याने रात्रीच्या 11:30 च्या सुमारास हल्ला करून कालवड फस्त केल्याची घटना घडली आहे.

कासार यांचा गाईंचा गोठा बंदिस्त असताना देखील बिबट्याने घराच्या समोर गोठ्यात घुसून कालवड ठार केली आहे.घटनेची खबर समजताच वनविबाचे....... कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला असून... तातडीने या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments