संगमनेर खुर्द (संजय गोपाळे)
परमपूज्य श्री श्री श्री नारायण महाराज (अण्णा )यांचे आशीर्वादाने व परमपूज्य श्री टेंबे स्वामी यांचे अधिपत्याखाली श्री क्षेत्र नारायणपूर येथे भव्य दिव्य दत्त जयंती दिनांक 2 व 3 डिसेंबर 2025 पर्यंत संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी संगमनेर डेपोद्वारे आयोजित 'गाव तेथे एसटी सेवा" या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे. दिनांक 27/11/ 2025 रोजी पायी मोफत दिंडी सोहळा श्रीक्षेत्र नारायणपूर कडे अगोदरच प्रस्थान झाला आहे. त्या
पाठोपाठ दिनांक 1/12/ 2025 रोजी जवळेकडलग येथून श्री. ज्ञानदेव माऊली देशमुख यांचे घरापासून भव्य दिव्य पायी ज्योतीचे आयोजन तरुणांद्वारे करण्या
त आलेले आहे .त्यानंतर राहिलेल्या भाविकांसाठी संगमनेर डेपोद्वारे ,"गाव तेथे एसटी" याप्रमाणे प्रत्येक गावागावातून ग्रुप करून साधारणतः 35 ते 40 सीट झाल्यानंतर बसेस ची सुविधा करण्यात आलेली आहे. तरी भाविकांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपली सेवा श्री दत्त महाराजांच्या चरणी रुजू करावी अशी विनंती करण्यात येत आहे . सर्वांनीपरमपूज्य सद्गुरु टेंबे स्वामींचे प्रवचन व दर्शन घ्यावे व या दत्त जयंतीचा सोहळा याची देही याची डोळा बघून कृतकृत्य व्हावे असे नम्र आवाहन दत्त सेवेकरी सिन्नर, संगमनेर, अकोले विभागातील सर्व दत्त सेवेकरी शिष्यमंडळ करीत आहे.


Post a Comment
0 Comments