* अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर लहीत तालुका अकोले या शाळेत इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई या संस्थेने शालेय साहित्य विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.
लहीत खुर्द गावचे नागरिक श्री अविनाश शिंदे हे मुंबई येथे नोकरी निमित्ताने कार्यरत असून त्याचा मित्र परिवाराने इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन नावाची अर्थात IDF नावाची संस्था स्थापन करून गरजू व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप करत असतात.मागील वर्षी या संस्थेने लहीत खुर्द परिसरातील सर्व शाळांना असेच शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केले होते. अंबिकानगर शाळेत बहुतेक मुले ही आदिवासी भागातील आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांच्या हातात मिळतात विद्यार्थीच्या चेहरावर एक वेगळाच आनंद दिसत होता . या शैक्षणिक साहित्याचा वापर विद्यार्थी नक्कीच आपल्या शैक्षणिक प्रगती साठी करतील यात कोणतीही शंका नाही.शैक्षणिक साहित्य मोफत वाटप केल्या बदल IDFच्या सर्व टिमचे शाळा व व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो.
या कार्यक्रमासाठी लहीत खुर्द गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती अनिता गोडसेताई, उपसरपंच श्री राहूल गोडसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री योगेश जाधव,उपअध्यक्षा श्रीमती प्रियंका गोडसे,तसेच शाळा संस्थापक अध्यक्ष श्री अंकुश गोडसे, डॉ किशोर गोडसे, डॉ सुधाकर शिंदे, श्री किशोर रोहिदास गोडसे, श्री रविंद्र गोडसे व इतर गावांतील प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments