संगमनेर खुर्द :(संजय गोपाळे )
संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील युवकाने आपला वाढदिवस चक्क स्मशानभूमीत वृक्षारोपण करून साजरा केला.
विजय भारत कासार या उद्योजक युवकाने आपला वाढदिवस सोंगा-ढोंगात साजरा न करता गावात व संपूर्ण पंचक्रोशीत एक आदर्श निर्माण व्हावा यासाठी त्याने आपला वाढदिवस कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा झगमगटात साजरा न करता स्मशानभूमीत नारळाचे रोपे लावून वाढदिवस साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे .
या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, आपले गाव, शाळा त्याचप्रमाणे स्मशानभूमी ही सुशोभीकरण झाली पाहिजे यासाठी विजय कासार या युवकाने आपला वाढदिवस चक्का स्मशानभूमी साजरा केला आहे.
याप्रसंगी निमगाव खुर्द चे सरपंच धनराज गोपाळे,उपसरपंच राहुल चंद्रमोरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष गोपाळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पत्रकार संघाचे संगमनेर तालुकाध्यक्ष संजय गोपाळे, महासचिव सतीश कासार, दूध संस्थेचे चेअरमन सोमनाथ कासार, शिवसेनेचे युवा कार्यकर्ते सतीश गोपाळे , छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत गोपाळे, पांडुरंग कानवडे, आदर्श कासार, दीपक गोपाळे, संतोष गोपाळे,प्रवीण कडलग, अनिल गोपाळे, सदानंद कासार, पोपट कासार आदी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments