लोणी पोलिस स्टेशन येथे गुप्त माहितीदार मार्फत माहिती मिळाली की, ममदापूर गावातील सराईत गोमाफिया यांनी बाभळेश्वर, तालुका.राहाता , जि. अहिल्यानगर येथे म्हस्के मळा येथील शेता मध्ये गोवंश जनावरे वीणा चारा पाणी कत्तली साठी डांबून ठेवलेले आहे.
त्वरित लोणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मा. युवराज जी आठरे, अमोल फटांगरे, साईनाथ राशीनकर, चालक वर्पे अशांचे पथक रात्री बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकला असता तेथे
इसम नामे. १) अरबाज अब्बास शेख रा. बाभळेश्वर व २) सलीम बालम पठाण रा. बाभळेश्वर यांनी आपल्या राहत्या घरा शेजारी
14 जिवंत गोवंश जनावरे वीणा चारा पाणी निर्दयतेने आर्थिक फायद्या साठी
इसम नामे. 3. अरबाज अब्दुलहक कुरेशी रा. ममदापुर ता. राहाता जिल्हा अहिल्यानगर, 4. वसीम हनीफ कुरेशी रा. श्रीरामपुर, जिल्हा अहिल्यानगर, 5. फिरोज कुरेशी रा. श्रीरामपुर जिल्हा अहिल्यानगर यांच्या सांगण्यावरून कत्तली साठी बांधून ठेवलेले आहे.. त्वरित खात्री व जवाब घेता पंचनामा करून
लोणी पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारीत 2015)
चे कलम- 5 (अ), 5 (ब), 5 (क), 9, 11, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

Post a Comment
0 Comments