कोले (प्रतिनिधी )- पाणी टंचाई सारख्या महत्वाच्या प्रश्नावर तहसीलदार व बीडीओ यांना गांभीर्य नाही इतके निष्क्रीय अधिकारी मी प्रथमच पाहत आहे. असा संताप पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
अकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठक विठ्ठल लॉन्स येथे संपन्न झाली यावेळी पालकमंत्री ना.विखे बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी अमर माने, नगरपंचायत मुख्याधिकारी सौ.धनश्री पवार, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, कैलास वाकचौरे, शिवाजीराजे धुमाळ, सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव,विकास वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
अकोले आदिवासी तालुका आहे येथे जबाबदारीने काम केले पाहिजे तालुक्यात 10 टक्केच पाऊस झाला टँकर सुरु आहेत अधिकारिणी किती संवादनशील असले पाहिजे मात्र अकोलेच्या तहसीलदार बीडीओ ,तलाठी ,ग्रामसेवकांना कुणालाच टंचाई बाबत माहिती देता येत नाही. लोकांना पिण्यास पाणी मिळत नाही याचा काहिच फरक प्रशासनाला पडत नाही. अकोलेचे प्रशासन निष्क्रिय असल्याचे दिसते. अधिकारी सरकार साठी काम करत नाही तर ठेकेदारासाठी काम करत आहे का असा प्रश्न उपस्थित करत यापुढे आता असे चालणार नाही, आदिवासी भागातील योजनांची अंमलबजावणी वेळेत व दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक असून, नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यावर भर द्यावा. शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणेचे काम प्रशासनाने करावे अश्या सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
पुढे बोलताना पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक समन्वय ठेवावा. गावपातळीवरील नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यात यावे. टँकर नियोजनाबाबत वस्तुस्थितीशी सुसंगत माहिती सादर करण्यात यावी आणि टंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा.
बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचाही आढावा घेण्यात आला. ३२ गावे, एक दरी व शमशेरपूर या प्रादेशिक योजनांतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. देवठाण पाणीपुरवठा योजनेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. अपूर्ण कामांसाठी संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले.
बैठकीत विविध विकासकामांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. लहीत खुर्द येथील पाझर तलावाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्राप्त तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच धामणगाव आवारी येथील उच्चस्तरीय पाइपलाइनचे पाणी स्थानिक बंधाऱ्यात सोडण्याबाबत तातडीने सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींसोबत समन्वयाने काम करावे. विकासकामांच्या मंजुरीपासून अंमलबजावणीपर्यंत सर्व प्रक्रिया पारदर्शक ठेवून नागरिकांच्या अडचणींचे वेळेत निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कामकाजात जबाबदारी, गुणवत्ता व वेळेचे नियोजन यांना प्राधान्य द्यावे,
यापुढे प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे सविस्तर आढावा घेतला जाईल आणि कामांच्या प्रगतीचे नियमित परीक्षण केले जाईल, असेही श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
------------------------------
कोट --001
सगळ्यात निष्क्रिय खाते जल जीवन व जीवन प्राधिकरण खाते आहे.
जीवन प्राधिकारणाचा सर्वत्र बोगस कारभार आहे.
योजना सुरु करताना उद्भव पाहिले पाहिजे.नुसत्या योजना करून उपयोग नाही जीवन प्राधिकरण --प्रत्येक कामात विलंब का झाला तसेंच.किती ठेकेदारांना योजना अपूर्ण असताना किती नोटीसा दिल्या हे अधिकारीना सांगता येत नाही .लवकरात लवकर अधिकृत लुहून माहिती मला पाठवा मुंबईत संबधित मंत्रीशी बैठक लावतो.या विभागाचे अधिकारी उद्धट बोलतात बेजबाबदार पणे वागतात अश्या तक्रारी आहेत.त्यामुळे सगळ्यात निष्क्रिय खाते जल जीवन व जीवन प्राधिकरण खाते असल्याचे मत ना.विखे यांनी व्यक्त केले
कोट 002
टंचाई च्या काळत ग्रामसेवक व तलाठी यांनी सकाळीच गावात हजर राहिले पाहिजे .
आदिवासी तालुका असलेल्या अकोले तालुक्यात पाऊस अत्यल्प झालेला आहे.टँकर सुरु आहेत
लोकांना पाणी मिळते की नाही यांची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे .टंचाई च्या काळत ग्रामसेवक व तलाठी यांनी सकाळीच गावात हजर राहिले पाहिजे अश्या सूचना पालकमंत्री यांनी केल्या
कोट 003--
.
तालुक्यातील मवेशी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाची एका कार्यकर्त्यांनी माहिती देताच त्याची गंभीर दखल घेत्, या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिली.
कोट 04
आदिवासी विकास विभागाच्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या विविध कामांसह् अनेक कामाची ठेकेदाराची बिले मिळालेली नाहीत त्यामुळे विकास कामे अपूर्ण आहेत ठेकेदाराची बिले मिळावी जेने करून कामे पूर्णत्वाकडे जातील अशी मागणी बाजीराव दराडे यांनी केली असता या प्रश्ना संदर्भात आदिवासी विकास मंत्री समवेत आधीवेशन नंतर बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
******
कोट 005
महायुतीतील काम करणारे कार्यकर्ते वर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी महायुतीच्या पदाधिकाऱ्याचे काम घेऊन आल्यावर अधिकाऱ्यांनी ते प्राधान्याने करावे.जे अधिकारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना जुमानत नाही तर त्यावर कारवाई करेल

Post a Comment
0 Comments