पिंपरी-चिंचवड : जागतिक महिला दिनानिमित्त लोकहीतवादी सेवा संघाच्या वतीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या धुळीच्या समस्येबाबत आवाज उठवत शहर धुळमुक्त करण्याची मागणी केली.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे आणि सचिव - विशालभाई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे तर उपाध्यक्षा रेखा काटे होत्या. तसेच साध्वी निंबाळकर, अतिश दुधावडे, ऋषिकेश वाघमारे आणि अनिता चोपडे यांचेही विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमादरम्यान महिलांनी पिंपरी-चिंचवड शहराचे सुपर महापौर रवीभाऊ लांडगे यांच्याकडे शहर धुळमुक्त करण्याची मागणी केली. शहरात वाढलेल्या धुळीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून श्वसनाचे आजार वाढत असल्याची चिंता महिलांनी व्यक्त केली. तसेच शहरातील AQI (एअर क्वालिटी इंडेक्स) वाढत असल्याने घराबाहेर पडल्यावर नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होत असल्याचे सांगत यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंती महिलांनी केली.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष अजिंक्य विजय (आप्पा) वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
अशा प्रकारे लोकहीतवादी सेवा संघाच्या वतीने महिला दिन सामाजिक प्रश्नाला वाचा फोडत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

Post a Comment
0 Comments