Type Here to Get Search Results !

संगमनेर नगरपालिकेच्या कुत्र्यांच्या नसबंदी चुकीच्या पद्धतीने चोराला सोडून संन्याशाला फाशी संगणमेर नगरपालिकेचा प्रकार

 

संगमनेर प्रतिनिधी


 संगमनेर नगरपालिकेच्या वतीने कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली मुकया प्राण्यांवर निर्दयी वागणूक केल्याचे प्रकार समोर येत आहेत संगणमेर शहरातील स्थानिक नागरिकांच्या भटक्या  कुत्र्यांच्या वाढत्या तक्रारीवरून गोरक्ष दल प्राणी मित्र संघटना व इतर प्राणी मित्र संघटना यांनी केले होते परंतु या प्रक्रियेत थोड्या दिवसात फार मोठ्या प्रमाणात प्राणिमात्रांवर अन्याय  केल्याचे दिसून येत आहे.

 संगमनेर मधील मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन छत्रपती संभाजी नगर येथील कल्पक संस्थेला देण्यात आले परंतु या संस्थेमार्फत अत्यंत निर्दयीपणे कुत्र्यांना पकडण्यात आले अनेक कुत्री त्यात जखमी झाले अनेक कुत्री यात मुर्त पावले जखमी कुत्र्यांवर योग्य उपचार झाले नाहीत  असे प्राणी मित्रांचे मत आहे त्याचप्रमाणे या मिशनमध्ये मोठे कुत्रे पकडणे ऐवजी लहान पिले पकडून आपली पोळी भाजून घेण्याचे काम सदर संस्थेने केले आहे एक प्रकारे मिळालेल्या टेंडरचा हा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे 

 नसबंदी केलेल्या कुत्र्यांना अस्वच्छ जागेत ठेवले जाते यात अनेक कुत्र्यांचा प्राण जात आहे 26 फेब्रुवारी रोजी एका कुत्र्याने बाहेर पडण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू केला परंतु अस्वच्छ वातावरण अयोग्य ट्रीटमेंट यामुळे या कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला 


 या नसबंदीच्या कार्यवाहीत कुठल्याही प्रशिक्षित पशु वैद्यकीय डॉक्टर नसून या कुत्र्यांवर इलाज केले जातात यात अनेक वेळेस इलाज चुकीचे ठरतात त्यामुळे आणि कुत्र्यांना आपल्या जीवाची आहुती द्यायला लागते या संस्थेमार्फत ठरवलेल्या कोणत्याही नियमाचे पालन करण्यात येत नाही ठरवलेल्या आहाराऐवजी इतर स्वस्त आहार देण्यात येतो.


 वेगवेगळ्या प्राणी संघटनांनी यात लक्ष घालून आणि सूचना दिल्यानंतरही सदर संस्थेने याबाबत काहीही कार्यवाही केलेली नाही त्यामुळे प्राणी संघटनांकडून व प्राणी मित्रांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे 

 गोरक्षक दल व इतर प्राणी संघटनांमार्फत संगणमेर शहर पी आय यांना याबाबत निवेदनही देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ प्रांताधिकारी डी वाय एस पी पशुवैद्यकीय अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांनाही निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे सदर कंपनीचे टेंडर स्थगित करून प्राणीमात्रांवर दया व्हावी अशी अपेक्षा प्राणिमित्र अविनाश शाह यांनी व्यक्त केली आहे

Post a Comment

0 Comments