Type Here to Get Search Results !

नारायण महाराज (अण्णा) क्षेत्र नारायणपूर यांचे लाडके शिष्य ह.भ.प. ज्ञानदेव उर्फ आप्पा माऊली देशमुख यांचे निधन.

 

संगमनेर खुर्द (संजय गोपाळे)


संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथील ह.भ. प. ज्ञानदेव देशमुख (माऊली) यांचे निधन झाले आहे. 

श्रीक्षेत्र नारायणपूर देवस्थान चे परमपूज्य कै. अण्णा महाराज यांचे परम शिष्य व वारकरी ज्ञानदेव देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

दत्त महाराजांचा वारकरी हरपल्याने सर्वांनाच धक्का बसला. सर्वांना आनंद देणारे सर्वांना बरोबर घेऊन चालणारे ते एकटेच गेले. 'आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना' या रितीप्रमाणे जवळेकडला परिसरातील सर्वांचे लाडके आप्पा आज निघून गेले. 

माणसातला माणूस जागा करा हा संदेश सद्गुरु अण्णा महाराजांनी सर्वांना दिला आणि हाच संदेश १९८६ पासून सर्व दत्त सेवेकरी जन जागृतीची मोहीम सुरू केली ती आजता गायत आप्पांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. तब्येतीची सुधारणा होत असताना अचानक आप्पांचे जाणे मनाला चटका लावून गेले. सुभाष खडांगळे आप्पांचे परममित्र राहायला शेजारी शेजारी घर. शाळेत पुढे बरोबर शिकलो. परमार्थ करत असताना आदरणीय मोरेदादांच्या म्हणजेच स्वामी समर्थांच्या दरबारात गेलो. त्यानंतर श्री क्षेत्र मढी येथे देखील काही दिवस स्व.संभाजी राजे थोरात स्व.रामनाथ बबन देशमुख आप्पा माऊली दर अमावस्येला जात असत. त्यानंतर श्री क्षेत्र नारायणपूर क्षेत्राची ओळख झाली आणि सद्गुरु नारायण महाराजांच्या सानिध्यात गेलो आणि दत्तमय होऊन गेलो. साक्षात दत्त महाराज म्हणजे अण्णा महाराज आमच्यावर पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करत असत. आजही सद्गुरु अण्णा महाराजांचे सानिध्य आम्हाला स्वप्नामध्ये, प्रत्यक्षात जाणवते. सद्गुरु नारायण महाराजांनी आप्पा माऊली यांना भरभरून प्रेम दिले. साधारणतः दोन हजार शिष्यांमध्ये आप्पा माऊली हे अतिशय प्रिय शिष्य होते . महाराजांच्या आवडीनिवडी आप्पांनी लक्षपूर्वक पाहिल्या त्या पद्धतीने त्यांनी त्या आत्मसात करून त्यांचा विश्वास संपादन केला. आणि त्याचबरोबर चार धाम चार स्थापनेच्या कार्यात जागा शोधण्यापासून तर मंदिर पूर्ण होईपर्यंत अण्णांच्या पावलोपावली बरोबर राहिले. इतकेच नव्हे तर कलकत्त्याला मंदिराचे अधिपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हे कर्तुत्व साध्य करणारे आप्पा माऊली खरोखरच भाग्यवान शिष्य व अधिकारी व्यक्ती होते. सद्गुरु नारायण महाराजांचे आप्पांवर इतके प्रेम होते की एकदा प्रवासामध्ये आप्पांचे बनियन फाटले व असता सद्गुरु अण्णांनी ते बनियन स्वतः शिवून दिले. आप्पा माऊलींनी खरोखर खऱ्या अर्थाने परिपूर्ण असे अध्यात्मिक जीवन जगले त्यांच्या जीवनात अध्यात्म सोडून दुसरा विषय नव्हता .गावापासून अध्यात्माची सुरुवात करून संगमनेर अकोले सिन्नर हा भाग त्यांनी दत्त सेवेसाठी पिंजून काढला कित्येक आदिवासींच्या घरात त्यांनी ज्ञानाचा दिवा लावला .माणसातल्या माणूस खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे कार्य करता करता आप्पांना हा आजार केव्हा झाला हे सुद्धा कळले नाही. पण या आजाराचा थोडा सुद्धा परिणाम त्यांच्यावर नव्हता .मरणाला काहीतरी निमित्त हवे म्हणून ते निमित्ताने गेले .परंतु त्यांचे कार्य दत्त भक्तांच्या आणि सामान्यजणांच्या मनामनात कायम प्रेरणास्त्रोत म्हणून अमर राहील .

Post a Comment

0 Comments