संगमनेर खुर्द: (संजय गोपाळे)
नुकत्याच झालेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निमगाव खुर्द च्या सुनबाई, व अकोले तालुक्यातील म्हाळदेवी देवी गावचे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब मारुती हासे यांची लेक काजल निखिल गोपाळे यांनी बहुजन विकास आघाडी या पक्षातून वार्ड क्रमांक 21 क (महिला ओपन) मधून ९९८५ मते घेऊन दणदणीत विजय प्राप्त केला आहे. समोरील भारतीय जनता पार्टीच्या पुनम बिजलान
यांना पराभूत करत केले .
वार्ड क्रमांक 21 क मधून बहुजन विकास आघाडीचे चार पैकी तीन उमेदवारानी दणदणीत विजय प्राप्त केला आहे.
काजल निखिल गोपाळे, प्रार्थना प्रवीण मुंडे, व अनिल अनंत भोईर हे नगरसेवक विजयी झाले आहेत.
गेली ३५ वर्षापासून बहुजन विकास आघाडी वसई विरार ही ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी फक्त लढा जनतेच्या सेवेसाठी या ब्रीद वाक्यावर काम करत असताना, वसई, नालासोपारा, भोईसर, या विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन आमदार व एक खासदार अशी कारकीर्द संघटनेची असून, नुकत्याच झालेल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीचे ७१ नगरसेवक हे दणदणीत विजय झाले आहेत. तर भारतीय जनता पार्टीचे ४३ उमेदवार निवडून आले आहे.
वसई विरार महानगरपालिके मध्ये बहुजन विकास आघाडीची एक हाती सत्ता आली आहे .
निमगाव खुर्द च्या सुनबाई, व म्हाळदेवी गावची लेक काजल निखिल गोपाळे त्यांची वसई विरार महानगरपालिकेच्या नगरसेविका पदी दणदणीत विजय मिळवल्याबद्दल संगमनेर व अकोले तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments