Type Here to Get Search Results !

बहुआयामी व्यक्तिमत्त्व श्री संतोष दिवे सर*

 

प्रतिनिधी अकोले


जिल्हा परिषद अहिल्या नगर, पंचायत समिती अकोले व विज्ञान गणित अध्यापक संघ अकोले आयोजित 53 वे अकोले तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन 18,19 व 20 डिसेंबर 2025 या तीन दिवशी माॅडर्न हायस्कूल अकोले येथे आयोजित करण्यात आले होते ‌.


यामध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपले विज्ञान गणित विषयांचे माॅडेल सादर केले होते. यामध्ये आदर्श गावाची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहीत खुर्द शाळेचे विज्ञान पदवीधर,कला साहित्यिक आदर्श शिक्षक श्री संतोष दिवे सरांनी शैक्षणिक साहित्य शिक्षक गटातून दुसरा क्रमांक पटकावला. दिवे सरांनी यावेळी या प्रदर्शनात फिरती विज्ञान प्रयोगशाळा हे माॅडेल सादर केले होते ‌. कुठेही सहजपणे नेता येणारी कमी खर्चाची ही प्रयोगशाळा त्यांनी तयार केली होती. अकोले तालुक्यातील लोकप्रिय आमदार डॉ श्री किरणजी लहामटे साहेब यांच्या हस्ते टाॅफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या तीन दिवशी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले ते आपल्या कलेने प्रसिद्ध असलेले श्री संतोष दिवे सरांनी प्रदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या गालावर काढलेला तिरंगी झेंडांची प्रतिकृती हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. आणि तसेच श्री संतोष दिवे सरांनी स्वतः परिधान केलेला भूतान देशाचा राष्ट्रीय पोशाख हा सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. भूतान हा देश जगातील सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे.जगातील सर्वात आनंदी देश भूतान आहे.जगातील सर्वप्रथम प्लास्टिक बंदी करणारा भूतान देश आहे. पर्यावरण धोरण सर्वप्रथम भूतान देशाने राबविले आहे.एकूण भूभागापैकी 71% जमिनीवर जंगल भूतान मध्ये आहे ‌. पारंपारिक वेशभूषा राष्ट्रीय पोशाख अनिवार्य करणारा देश भूतान आहे ‌.पुरुषाच्या तुलनेत महिलांना जास्त अधिकार देणारा देश भूतान आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी करणारा देश भूतान आहे.

हे सर्व आपल्या शेजारच्या भूतान देशात होते तर ते आपल्या कडे होऊ शकते असा संदेश त्यांनी प्रदर्शनात पोस्टर आणि पोशाखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पंचायत समिती अकोले चे गटशिक्षणाधिकारी मा श्री अरविंद कुमावत साहेब , विस्तार अधिकारी मा श्री दोरगे साहेब,लिंगदेव बीटाचे आदर्श विस्तार अधिकारी मा श्री संभाजी झावरे साहेब तसेच लहीत खुर्द चे केंद्र प्रमुख श्री वाल्मिक बडे साहेब ,लहीत खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा नवले मॅडम तसेच लहीत खुर्द केंद्रातील सर्व शिक्षक नेते व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मार्गदर्शन केले आणि विशेष कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments