संगमनेर खुर्द (संजय गोपाळे)
परमपूज्य श्री श्री श्री नारायण महाराज (अण्णा )यांचे आशीर्वादाने व परमपूज्य टेंबे स्वामींच्या अधिपत्याखाली क्षेत्र नारायणपूर येथे तीन दिवसाचा भव्य दिव्य दत्त जन्म व जयंती सोहळा मंगळवार दिनांक 2/ 12/ 2025 ते गुरुवार दिनांक 4 /12/ 2025 या कालावधीत थाटामाटात संपन्न होणार आहे .
भाविकांनी या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा असे नम्र आवाहन दत्त सेवेकरी नारायणपूर मंडळ करत आहे. मंगळवार दिनांक 2 /12 /2025 रोजी प.पू. महाराजांच्या दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी येणाऱ्या ज्योतीचे स्वागत होईल. सायंकाळी चार ते सहा या वेळेत 200 कोटी शिवदत्त नाम यज्ञ व अखंड प्रज्वलित अग्निकुंड यांचा 25 वा वर्धापन दिन सर्वांना रांगेत, शिस्तबद्ध बसवून, होम हवन करून, शिवदत्त सहस्रनामावली घेऊन, भाविकांच्या दीपांचे पूजन होऊन, यज्ञकुंडाला आरती अर्पण करून, दीप पूजन करून नंतर दीप यज्ञात टाकले जाईल. नंतर मंदिरामध्ये जाऊन आरती होईल .या सर्व कार्यक्रमासाठी प्रत्येक भाविकांनी तामान, दीप, तेल ,वात इत्यादी सामान घेऊन येणे ही विनंती सर्व भाविकांना करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला मधुगंध म्हणजेच घुगऱ्यांचा प्रसाद देण्यात येईल. दुसरा दिवस बुधवार दिनांक 3/ 12/ 2025 रोजी दुपारपर्यंत येणाऱ्या सर्व दिंड्यांचे भव्य स्वागत दुपारी दोन वाजता केले जाईल व मंदिरामध्ये प्रदक्षिणा करून आल्यानंतर भालदार, चोपदार यांचे स्वागत केले जाईल. नंतर चार ते पाच वाजेच्या दरम्यान दत्त पादुकांवर अभिषेकाचा कार्यक्रम होईल व पाच ते सहा या वेळेत भजन कार्यक्रम असेल. तसेच सहा ते सात यादरम्यान दत्त जन्म आख्यान व फुले वाटपाचा कार्यक्रम होईल .बरोबर सात वाजून 30 मिनिटांनी दत्त जन्माचा सोहळा साजरा केला जाईल व याच निमित्ताने सर्व भाविकांना दत्तजन्माचा सुंठवडा प्रसाद म्हणून वाटला जाईल. त्याच दरम्यान आलेल्या मान्यवरांचा सत्कार व मनोगत होईल तसेच संगमनेर दत्त मंडळ तर्फे शोभेच्या दारूच्या आतिश बाजीचे मनोरम्य प्रदर्शन करण्यात येईल. तसेच रात्री साडेआठ ते नऊ या कालावधीत आरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. महाप्रसादानंतर रात्री हरिभक्त परायणकार निवृत्ती महाराज देशमुख, इंदुरीकर, अकोले यांचे कीर्तन होईल .रात्री साडेबारा वाजता हरिभक्त परायण कार लक्ष्मण राजगुरू यांचे भजनी भारुड होईल. त्यानंतर पहाटे चार ते पाच या दरम्यान सर्व मंदिरांमध्ये रुद्राचा कार्यक्रम होईल .तिसरा दिवस गुरुवार दिनांक 4/ 12/ 2025 रोजी पहाटे चार ते पाच या दरम्यान रुद्र सर्व मंदिरामध्ये होतील. साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पौर्णिमेचे होम हवन होईल. साडे आठ ते नऊ या दरम्यान सकाळची आरती होऊन दत्तपादुकांसह पालखी मंदिरा च्या बाहेर येईल की ज्या पुढे हत्ती, घोडे, लाठीकाठी ,लेझीम बँड, करंढोल या वाद्यांच्या गजरामध्ये ग्राम प्रदक्षिणा होईल. व ही ग्रामप्रदक्षिणा कुंडावर येऊन तेथे दत्त पादुकांना स्नान घालण्यात येईल व रुद्र म्हणून पादुकांचे पूजन होईल
. ती पालखी बरोबर दीड वाजता मुख्य मंदिरात येऊन देव भेट करण्यात येईल नंतर परमपूज्य स्वामींचे प्रवचन होईल आरती होऊन सर्वांना महाप्रसादाचे वाटप होईल. येताना सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की सर्वांनी प्रथेप्रमाणे माधुकरी मागत, मागत यावे की ज्यायोगे सर्वांचे कल्याण होईल आणि त्याच योगाने मी तु पणाची बोळवण होईल .कारण दत्त महाराज तीनही काळाचे करते असून भिक्षा मागून ते भोजन करतात. म्हणून आपण सर्व वर्षातून एकदा तरी माधुकरी मागून भोजन घ्यावे ही दत्त भक्तांच्या मंडळातर्फे आपणास विनंती .दरम्यान सर्व दत्त भक्तांना परमपूज्य स्वामींचे सामुदायिक दर्शन देखील मिळणार आहे. संध्याकाळी म्हणजे रात्री दहा वाजता पालखी मंदिरात मिरवून शेजारती होईल. आणि मग दत्त जयंतीचा कार्यक्रम संपेल. तरी लाखोंच्या संख्येने आपण श्रीक्षेत्र नारायणपूरला येऊन दत्त महाराज, स्वामी महाराज ,भरत नाना यांचे दर्शन होईल व दत्त जयंतीच्या निमित्ताने मार्गदर्शन घेऊन आपण सर्वांनी कृतकृत्य व्हावे अशी नम्र प्रार्थना दत्त सेवेकरी मंडळ आपणास करत आहे .नारायणपूरला येण्यासाठी खालील टीप लक्षात घ्यावी: दिनांक 27/ 11/ 2025 रोजी मोफत पायी दिंडीचे प्रस्थान दिनांक 1/ 12/ 2025 रोजी पायी दिंडीची ज्योत निघणार आहे .ही सर्व दिंडी मोफत स्वरूपात असून दिनांक 3/ 12/ 2025 रोजी सकाळी एसटी बसेस देखील सुटणार आहेत. गाव तेथे एसटी या दृष्टिकोनातून आपल्या गावात एसटी बस येण्यासाठी कमीत कमी 40 प्रवासी तयार करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments