राहुरी प्रतिनिधी :
राहुरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज (ता. २५ नोव्हेंबर २०२५) राहुरी शहरातील ऐतिहासिक बुवासिंद बाबा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या हा कार्यक्रम भाजपाच्या एकजुटीचे दर्शन घडवणारा ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मा. डॉ. सुजय विखे पाटील होते, तर मंचावर भाजपाचे सर्व उमेदवार, तालुका–शहर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
आपल्या भाषणात डॉ. सुजय विखे म्हणाले,
राहुरी शहरातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे. सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे, प्रामाणिकपणे आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून काम केले, तर राहुरी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल हा शंभर टक्के आपल्या बाजूने लागणार आहे.”
डॉ. विखे म्हणाले की, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी शहरात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. कर्डिले साहेबांच्या कार्याची पावती, त्यांच्यावर असलेला लोकांचा प्रेमभाव आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला दृढ विश्वास हे सर्व आता या निवडणुकीत दिसून येईल. त्यांच्या अधुर्या योजना पूर्ण करण्यासाठी आणि राहुरीच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणे आवश्यक आहे
कार्यक्रमात बोलताना अक्षय कर्डिले यांनी उपस्थितांना भावनिक केले. ते म्हणाले,
“स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या शिवाय हा प्रचाराचा शुभारंभ करावा लागतोय, ही गोष्ट आमच्या कल्पनाही नव्हती. पण त्यांच्या स्वप्नांचे ओझे आज आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. राहुरीत त्यांनी जे व्हिजन ठेवले होते, ते आजही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात जिवंत आहे.”
ते पुढे म्हणाले, साहेबांची अनेक वर्षांपासूनची एकच इच्छा होती राहुरी नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकला पाहिजे.’ आज ते आपल्यात नाहीत, पण त्यांच्या त्या महान इच्छेची पूर्तता करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राहुरी शहराचा विकास, नागरिकांची प्रगती आणि शहराचे सुशासन सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे.”
कार्यक्रमात उसळलेला उत्साह कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, लढण्याचा निर्धार व प्रचार शुभारंभाचा संपूर्ण परिसर “जय भवानी, जय शिवराय”, “भारतात माता की जय” आणि “भाजपाचा विजय असो” अशा घोषणांनी दुमदुमून गेला. शहरातील सर्व प्रभागांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले होते.
भाजपाच्या उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील प्रमुख प्रश्नांची नोंद घेतली. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विशेष सन्मानही करण्यात आला
येणारी निवडणूक ही राहुरीच्या विकासाचा निर्णायक टप्पा असेल. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट सिटीसारख्या संकल्पना आणि नागरिकाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे.

Post a Comment
0 Comments