संगमनेर प्रतिनिधी
पिंपळे ग्रामपंचायत कार्यालया समोरील विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर पासून ग्रामस्थांच्या हक्काचा लढा पेटुन उठणार आहे, गावकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे ग्रामपंचायत कडुन सतत दुर्लक्ष होत असल्याने शेवटी ग्रामस्थांना आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला आहे अशी माहिती उपोषणकर्ते आण्णासाहेब गंगाधर चकोर व रमेश मनोहर ढोणे यांनी महासत्ता वृत्तवाहिनीच्या प्रतीनीधिना दिली आहे.
पिंपळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कडे वेळोवेळी केलेली विचारपूस ग्रामपंचायत प्रशासनाकडुन निरर्थक ठरली आहे यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे यामुळे “हक्काची मागणी मान्य झालीच पाहिजे!” यावर ग्रामस्थांचे ठाम एकमत झाले आहे.
गावातील अनेक ज्वलंत प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायत व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उपोषणकर्ते आण्णासाहेब गंगाधर चकोर रमेश मनोहर ढोणे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही.
१) ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या गावातील सर्व स्टोन क्रेशर कायमस्वरूपी बंद करावेत, स्टोश क्रशर मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण यामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे, शेतीमालावर परिणाम होत आहे.
२) जुन्या नोंदीप्रमाणे जमिनीचे रेकॉर्ड पुर्ववत करावे, गट नंबर ३२६/अ, ३२६ /बी, ५५२/१, ५५३/२ पुर्ववत रेकाॅर्डवरुन मिळावे, २१६२, २१६३ हे फेर रद्द करावे.
३) अंगणवाडीतील मंजूर शौचालयाचे काम का थांबले, याचा खुलासा करावा.
४) जल जीवन मिशनांतर्गत मोफत जोडणी असूनसुद्धा ग्रामपंचायतीने घेतलेल्या डिपॉझिटचा हिशेब द्यावा.
५) अन्न सुरक्षा योजनेतील यादीत घोळ करून काही लाभार्थ्यांचे नावे हेतु पुरस्कर वगळले आहे याचे कारण समजावे.
६) प्रधानमंत्री आवास घरकुल, माता रमाई घरकुल, शबरी घरकुल योजनेसाठी पात्र भुमीहीन लाभार्थी गोरगरीबांना जागा उपलब्ध करून द्यावी.
या सर्व मागण्या ग्रामपंचायत कडुन मान्य होत नसल्याने ग्रामस्थांचा रोष ओढवून आला आहे , “गावकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडून आहेत, लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत जबाबदारी टाळत आहेत. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. जोपर्यंत हक्क मिळत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.”
ग्रामस्थांच्या लढ्यामुळे पिंपळे गावात संतापाचे व निर्धाराचे वातावरण आहे. होणार्या उपोषणाला ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा मिळत असून येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment
0 Comments