Type Here to Get Search Results !

अंबिकानगर लहीत खुर्द शाळेत अनोखे रक्षाबंधन*

 * प्रतिनिधी अकोले


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर लहीत खुर्द तालुका अकोले या शाळेत आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने शाळेतील सहशिक्षक श्री भागवत घुले यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची विद्यार्थीनी शपथ घेऊन अनोखे वृक्षाबंधन साजरे करण्यात आले. ‌हरित लहीत खुर्द या संकल्पनेतून तसेच प्रधान मंत्री एक पेड माॅ के नाम उपक्रमातुन हजारो झाडे लावली आणि त्यांचे संवर्धन करण्याची शपथ विद्यार्थी बरोबर पालकांनी घेतली‌. यावेळी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्रीमती अनिता ताई गोडसे, उपसरपंच श्री राहुल गोडसे, पोलिस पाटील श्री विकास गोडसे,डॉ किशोर गोडसे,शाळा संस्थापक श्री अंकुश गोडसे, शाळा व्यवस्थापन समिती श्री योगेश जाधव, उपाध्यक्ष श्रीमती प्रियंका गोडसे, राजश्री गोडसे,शितल शिंदे, अश्विनी मिंढे,ह.भ.प गणपत गोडसे गुरूजी, श्री रविंद्र गोडसे, श्री प्रविण गोडसे , श्री प्रविण मिंढे, श्री संतोष मिंढे यासह ग्रामस्थ व पालक हजर होते.

Post a Comment

0 Comments