संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धांदरफळ पंचकोशी येथील श्री क्षेत्र रामेश्वर येथे श्री हरी ओम परिवार व वृक्षमित्र परिवार यांच्या वतीने श्री अविनाश वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 151 महिला भगिनींसाठी श्री गुरुचरित्र पारायण यांच्या आयोजन करण्यात आले होते दिनांक सहा ऑगस्ट ते दहा ऑगस्ट यादरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हरी ओम परिवार यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र रामेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त महाप्रसाद व भंडारा यांचेही आयोजन करण्यात आले आहे सर्व शिवभक्त आणि भाविक यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री अविनाश वाकचौरे यांनी केले आहे
यापूर्वीही मागील महिन्यात या परिवारा मार्फत महारुद्र यज्ञ या विधी शिवमहापुराण कथा व पुरुषांसाठी श्री गुरुचरित्र पारायण सोहळा यांच्या आयोजन करण्यात आले होते यातही दीडशे पेक्षा जास्त पुरुषांनी या पारायणाचा लाभ घेतल्या होता
महारुद्र यज्ञ याग विधी शिव महापुराण कथा व श्री गुरुचरित्र पारायण या कार्यक्रमांसाठी पंचक्रोशीतील नागरिक व भाविक भक्त यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्या त्याचप्रमाणे लाखो भाविकांनी महाप्रसादाचे लाभ मिळाला


Post a Comment
0 Comments