Type Here to Get Search Results !

गणपती बाप्पा बळीराजाच राज्य येऊ दे

*मी ५ वी ला असतांना घरी ५ रुपयांचा गणपती बसवला होता.आज माझा मुलगा ५ वी ला आहे त्याने घरी ५०० रुपयांचा गणपती बसवला आनंद आहे कारण ५ रुपयांच्या कितीतरी वाढिव पटीने  ५०० रुपयांचा गणपती त्याने घरात बसवला, पण एक खंतही वाटते या निमित्ताने आज, गणपती म्हणजे  देवतांन् बरोबरचं  सर्वच गोष्टीचे दर वाढले आहेत. अगदी १० ते  ५० पेक्षा जास्त पटीने दर वाढलेत. पण मी ५ वीत असतांना आमचा शेतमाल कांदा तेव्हाही १००० रुपये क्विंटलने विकतांना पाहिले आहे आणि आज कितीतरी वर्षांनी माझा मुलगा ५ वी ला आला तरी तोच कांदा मला १००० रुपये क्विंटलनेच विकावा लागतोय. ५ रुपयांची वस्तू ५०० ला झाली मात्र १००० रुपये क्विंटलचा कांदा अजुनही १००० चं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, सगळ्यांचं वस्तुचे दर वाढतं चाललेत मग शेतमालाचे दर कधी वाढणार ??; थोडक्यात गणरायाला एकचं विनंती आहे की, ईडा, पिडा जाऊ दे अन् गणपती बाप्पा तुझ्या आशिर्वादाने लवकरचं बळी राजाचं राज्य येऊ दे.........*


*✍️पत्रकार राकेश आहेर चांदवड-देवळा*


Post a Comment

0 Comments