मुंबई प्रतिनिधी, दि.२८_ महार वतन जमिनीचे अनधिकृतरित्या झालेले व्यवहार, खरेदीखत, हस्तांतरण रद्द करून त्या जमिनी मूळ वतनदारांना परत मिळण्यासाठी मागील २२ दिवसापासून महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान- महाराष्ट्र अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपकभाऊ निकाळजे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे हे मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत.
महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठान- महाराष्ट्र अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपकभाऊ निकाळजे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे हे मागील चार - पाच वर्षांपासून ' महार वतन जमीन ' या विषयावर सक्रियपणे काम करत आहेत. त्यांनी समाजातील कित्येक पिढीत व्यक्तीचे महार वतन जमिनीसंदर्भातील विषय मार्गी लावले आहेत. या विषयावर काम करत असताना त्यांच्या लक्षात आले की, बऱ्याच गावात महार वतन जमीन असून शासन, प्रशासन आणि राजकारणी मंडळीच्या आशीर्वादाने त्या जमिनी गावगुंड, सावकार आणि भूमाफिया यांनी जबरन कवडीमोल भावात अनधिकृतपणे व्यवहार करून फसवणूक केल्याचा आरोप शशिकांत दारोळे यांनी केला.
आजपर्यंत शेकडो तक्रारी जिल्हाधिकारी, सरकार दरबारी धूळ खात पडल्या असून वर्षानुवर्षे बौद्ध समाजाच्या या ज्वलंत प्रश्नाकडे शासन, प्रशासन काना डोळा करत आहे. सरकार आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी महार वतन हक्क सेवाभावी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शशिकांत दारोळे हे दि.६ ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. दारोळे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या कमजोरीमुळे त्यांना अशक्तपणा आला असल्याची त्यांनी सांगितले. दोन वेळेस मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत त्यांची भेट झाली. परंतु अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. सरकारने त्वरीत समाजाच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंतीवजा मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली असता एकवीसव्या दिवशी प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले परंतु जो पर्यंत पुढील अहवाल सादर होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु रहाणार आहे अशी ठोक भूमिका शशिकांत दारोळे यांनी घेतली असल्याची एका पत्राद्वारे कळविले.
*शशिकांत दारोळे*
*9359055213*

Post a Comment
0 Comments