Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिनी अंबिकानगर लहीत खुर्द शाळेत शालेय साहित्य वाटप*

 * प्रतिनिधी अकोले


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर लहीत खुर्द तालुका अकोले शाळेत स्वातंत्र्य दिनी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कोतूळ परिसरात आपली सेवा देणाऱ्या  सेवानिवृत्त आदर्श मनमिळाऊ शिक्षिका श्रीमती अनुसया गोडसे मॅडम यांनी आदिवासी मुलांची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पाणी बाॅटल व कंपास बॉक्स साहित्य चे वाटप करण्यात आले. लहीत लिंगदेव परिसरात नावाजलेले सेवानिवृत्त  शिक्षक ह.भ.प गणपत गोडसे महाराज यांच्या या पत्नी आहेत‌‌. तसेच लहीत खुर्द गावचे सुपुत्र आदर्श मनमिळाऊ शिक्षक श्री भाऊसाहेब गोडसे सर यांनी शाळेसाठी भिंतीवरील दोन घड्याळ भेट म्हणून यावेळी दिली ‌. लहीत खुर्द गाव म्हणजे दानशूर लोकांचे गाव अशी ओळख पूर्वी पासून आहे. यावेळी शाळेच्या वतीने साहित्य देणारे दानशूराचे मनःपूर्वक आभार मानले गेले. येथून पुढे शाळेची गरज लक्षात घेऊन शाळेसाठी भरीव मदत करण्याचे आवाहन यावेळी शाळेच्या वतीने करण्यात आले.


Post a Comment

0 Comments