अकोले दि.२६ प्रतिनिधी
तालुक्यातील २४५ दिव्यांग व्यक्तींना सुमारे ३९लाख ३०लाख रुपयांच्या सहाय्यक साधन साहीत्याचे वितरण शुक्रवारी करण्यात येणार आहे.
भारत सरकारच्या इंडीयन ऑयल कार्पोरेशन लिमिटेड यांच्या सामाजिक दायित्व योजने अंतर्गत तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( अलिम्को ) तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आणि जिल्हा दिव्यांग विभाग अहील्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना साधन साहीत्याचे वितरण करण्यात येते. अहिल्यानगर जिल्ह्यात जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवानेते भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच मा.आ.वैभवराव पिचड यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील दिव्यांगाना साधन साहीत्याचे वितरण सातत्याने करण्यात येत आहे. अकोले तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींची यासाठी नोंदणी करण्यात आली होती.
या साहीत्याचे वितरण शुक्रवार दि.२७मार्च २०२६रोजी सकाळी १० ते ४ या वेळेत अगस्ती महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे.साहीत्य वितरण समारंभास श्रीमती हेमलताताई पिचड, श्रीमती सुनिताताई भांगरे, सौ.धनश्रीताई विखे पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment
0 Comments