वाकड : लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष धर्मराज बनसोडे यांना समाजकार्य क्षेत्रातील उल्लेखनीय आणि सातत्यपूर्ण योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट (Honorary Doctorate) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २०१२ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या धर्मराज बनसोडे यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
धर्मराज बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली लोकहितवादी सेवा संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. अनाथ आश्रम व वृद्धाश्रमांना मदत, गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, तसेच महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे आयोजन करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा प्रभावी प्रचार व प्रसार केला आहे. त्यांच्या अधिकृत Instagram पेजवर विविध उपक्रमांची माहिती, फोटो व व्हिडिओ शेअर करण्यात येत असून, त्यातून अनेक युवक सामाजिक कार्यासाठी प्रेरित होत आहेत.
या पार्श्वभूमीवर लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सचिव विशाल भाऊ वाघमारे यांच्या हस्ते धर्मराज बनसोडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
हा सत्कार समारंभ आज सायंकाळी ५ वाजता, वाकड येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकहितवादी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव धर्मराज बनसोडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
धर्मराज बनसोडे यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Post a Comment
0 Comments