पुणे : लोकहितवादी सेवा संघाच्या वतीने आज विविध सामाजिक कार्यकर्त्यांची पदनियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे व राज्य सचिव विशालभाई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यामध्ये पर्यावरण समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अजिंक्य वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली, तर महिला अध्यक्षपदी रेखा ताई काटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच मनोजदादा पवार यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून बिलाल इनामदार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यासोबतच ऋषिकेश वाघमारे, निलेश कांबळे तसेच प्रशांत बाबर, रोहित बालवडकर, निलेश शेटे, शशिकांत गुप्ता असे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, लोकहितवादी सेवा संघाची नवीन शाखा वाकड येथे सुरू करण्यात आली असून, या माध्यमातून परिसरातील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी आणि जनतेची सेवा करण्यासाठी संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments