महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा.
रविवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह (सभागृह) संगमनेर या ठिकाणी संघटनेतील पदाधिकारी व सदस्यांचा महाराष्ट्र राज्याचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रांताधिकारी अरुण उंडे,संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, युवा उद्योजक भूषण शेटे, उद्योजक अशोकराव गोपाळे याच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
त्यानंतर सर्व पत्रकार बांधवांसाठी स्नेह भोजन कार्यक्रम देखील होणार आहे.
तरी सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय गोपाळ यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments