बारामती वृत्तसंस्था: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात. विमानातील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते शेतात कोसळले.
भीषण घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर सहा जणांचा मृत्यू झाले आहेत. विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी ८ वाजता मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत आज त्यांच्या चार महत्त्वाच्या निवडणूक प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी (Landing) सज्ज झाले असतानाच अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे वैमानिकाचा ताबा सुटला आणि विमान धावपट्टीवरून घसरून थेट जवळच्या शेतात आदळले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती
विमान कोसळल्यानंतर क्षणातच तिथून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडू लागले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्यास मदत केली. विमानात अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक होते. या सर्वांना तातडीने रुग्णवाहिकेतून बारामतीमधील एका हायटेक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अजित पवार यांच्या डोक्याला आणि पाठीला दुखापत होऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
चौकशी चे आदेश
नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) आणि विमानतळ प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमान जुने होते की देखभालीत काही त्रुटी होत्या, या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अजित पवारांच्या मृत्युंबाबत बातमी मिळताच बारामती ला जाण्याचे नियोजित केले आहे.
या अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण राज्यभरातून अजित पवार यांच्या समर्थकांत नाराजी पसरली असून दुःख व्यक्त केले जात आहे. कार्यकर्त्यांनी बारामतीतील रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली असून, शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या सर्व नियोजित सभा तूर्तास रद्द करण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या अपघाताची बातमी समजताच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दिल्लीतून बारामती कडे निघाल्या आहेत.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Post a Comment
0 Comments