Type Here to Get Search Results !

आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त संगमनेर मध्ये पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न!*

 *

संगमनेर | प्रतिनिधी:


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील पत्रकारांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. रविवारी (दि. ११ जानेवारी) सकाळी ११ वाजता संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


या कार्यक्रमात पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस , दैनिक समर्थ गावकरी चे मुख्य संपादक डॉ. विश्वासराव आरोटे होते. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उत्तर नगर जिल्हा प्रमुख सोमनाथ काळे, जिल्हा सचिव प्रा.राहणे, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे,युवा उद्योजक भूषण शेटे तसेच उद्योजक अशोकराव गोपाळे हे मान्यवर उपस्थित होते.


मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना वक्त्यांनी पत्रकारितेचे सामाजिक योगदान, लोकशाहीतील पत्रकारांची भूमिका, प्रशासनाने पत्रकारांची वेळोवेळी दखल घेऊन सहकार करण्यात यावे तसेच सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले.


कार्यक्रमानंतर सर्व पत्रकार बांधवांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संगमनेर तालुक्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्र. संदीप थोरात , व बाळासाहेब गडाख यांनी केले.

या सन्मान सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय गोपाळे यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पत्रकार बांधव व सहकाऱ्यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments