Type Here to Get Search Results !

लिंगेश्वर आदर्श विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडुन विद्यालयाच्या नावाचे दोन बोर्ड मोफत प्रदान

अकोले प्रतिनिधी


लिंगेश्वर आदर्श विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडुन विद्यालयाच्या नावाचे दोन बोर्ड मोफत प्रदान करण्यात आले. माजी विद्यार्थी श्री. मयुर बबन नवले ( निर्मल ग्रीन ऑरगॅनिक अँग्रो, संगमनेर ) व श्री. बिपिनचंद्र दतात्रय हांडे ( सी. आय. एस. एफ. नाशिक ) यांचे यात मोठे योगदान मिळाले.तसेच लिंगदेवचे तरुण व्यवसायिक श्री. भगवान होलगीर यांनी अतिशय सुंदर फ्रेम बनवून दिल्या व आमचे मित्र श्री. बबन कानवडे सर ( पेंटर ) यांनी सुंदर हस्ताक्षरात विद्यालयाचे नाव बनवून दिले.

गुरुवार दिनांक १७/१२/२०२५ रोजी या दोन बोर्डचे अनावरण सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. लहानुभाऊ फापाळे, श्री रामकृष्ण कानवडे, श्री.निवृत्ती (नाना ) कानवडे यांच्या हस्ते करण्यात आले. मा.श्री. लहानुभाऊ फापाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भविष्यात हे फलक अधिकारी वर्ग आणि नवीन लोकांसाठी मार्गदर्शक राहतील असेही ते म्हणाले. याप्रसंगी विद्यालयाचे पालक श्री. गोरक्षनाथ फापाळे, श्री. अनिल चौधरी, श्री. लक्ष्मण हाडवळे, श्री. सुनिल कोरडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. घुले सर, सहशिक्षक श्री. लांडगे सर, श्री. तांगडकर सर, श्री. रेवगडे सर, श्रीम. नेहे मॅडम, श्री. वाळूंज सर, श्री. शेटे सर, श्री. बाळचंद कोरडे व श्री. राजु चौधरी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थ्यांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले व भविष्यात अशाच काही उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments