लोणी दि.२४ प्रतिनिधी
भारतीय सिनेसृष्टीतील करीश्माई आणि रसिकांच्या मनात राहीलेले अभिनेता धर्मेद्रजी यांच्या निधनान भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सुवर्णयुग थांबले असल्याची भावना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हणले आहे की,धर्मेद्रजी आपल्या साधेपणातील व्यक्तिमत्वाने आणि अप्रतिम अभिनयाने लाखो रसिकांच्या मनात घर करून होते.शोलेतील धडाडीचा वीरू,अनुपमातील शांत प्रेमळ किंवा धरमवीर मधील त्यांची भूमिका तडफदार आणि तितकीच हिंदी चित्रपट सृष्टीचा वारसा बनून राहीली.बहारदार अभिनय आणि तितक्यात सहजतेने एक कलाकार म्हणून त्यांचे संवादकौशल्य तितकेच दमदार आणि कलाक्षेत्रात आपले वेगळेपण सिध्द करणारे होते.
सिनेसृष्टीतील आपल्या संपूर्ण कार्यकाळात प्रचंड मेहनत जिद्द आणि कलाकार म्हणून निष्ठेचे एक उतम उदाहरण होते.त्यांच्या निधनान सिनेसृष्टीने एक अनुभवी अभिनेता गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

Post a Comment
0 Comments