संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर व अकोले तालुक्यातील विद्युतीकरणाच्या कामाला गती देण्याच्या उद्देशाने वीज महामंडळाने संगमनेर येथे नवीन बांधणी उप विभागीय कार्यालय मंजूर केले आणि त्याची सुरुवात उप कार्यकारी अभियंता अरविंद गडाख यांच्या नेतृत्वाखाली १ जून १९८० ला झाली. सी एस् डी संगमनेर या नावाने हा उपविभाग ओळखला जातो. हनुमंत गुंजाळ, माधव मुलींटी, व्ही के पाटील, ए के पाटील असे सुरवातीचे अभियंते होते. लाईन मन, असिस्टंट लाईन मन आणि एन् एम् आर नेमले गेले. या उप विभागाने अनेक महत्वाची कामे केली. त्यामध्ये आदिवासी बहुल असलेला अकोला तालुक्याचे १०० टक्के विद्युतीकरण झाले.
भंडारदरा धरणाच्या दोन्ही बाजूंच्या सुमारे बावीस गावांचे विद्युतीकरण झाले. शेवटचे गाव घाटघर आहे, जेथे नंतर पम्प स्टोरेज जनरेशन सुरू झाले. भंडारदरा येथे झालेल्या दहा मेगावॅट जल विद्युत निर्मिती साठी लागणाऱ्या ३३ केव्ही राजूर वाहिनीची उभारणी केली. राजूर, कोतूळ, समशेरपूर अशा अनेक उपकेंद्रे उभारली.
आदिवासी विभागाच्या वतीने आदिवासी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १०० टक्के अनुदानित सर्व वीज पंपांचे विद्युतीकरण केले. संगमनेर येथे उभारणी झालेल्या १३२ केव्ही उपकेंद्राच्या वीज वापरासाठी लागणाऱ्या ११ केव्ही च्या आठ आणि ३३ केव्ही च्या चार वीज वाहिन्या उपकेंद्र सुरू होण्यापूर्वी तयार केल्या.असे कधीही होत नाही असे श्री. चापोरकर साहेब कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.शेती पंप ग्रुपची कामे केली. विशेष म्हणजे ही सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण केली. प्रत्येक काम सुरू केल्यावर ते पुर्णत्वास नेले. एकही काम अर्धवट रहात नसे. या सर्व बाबी सुरवातीच्या आठ वर्षांच्या कालावधीत आणि श्री. गडाख तेथे कार्यरत असताना झाली. या कालावधीत संपूर्ण उपविभाग एका कुटुंबा प्रमाणे रहात असे. या काळात नियमित कर्मचारी बदलत असत मात्र रोजंदारी कामगार तेच तेच होते. पुढे ते रेग्युलर झाले आणि नियमानुसार निवृत्त झाले. १९८८ नंतर आता २०२५ म्हणजे ३७ वर्षांनंतर त्यांच्यात जिव्हाळा आहे. सर्वांना एकमेकांना भेटण्याची इच्छा होती आणि मग त्यातूनच सी एस डी संगमनेर चा मेळावा आयोजित करण्याचे ठरविले गेले. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी हा मेळावा संगमनेर येथील कृष्णा लाॅंस मध्ये आयोजित करण्यात आला होता. पन्नास सदस्य येतील अशी अपेक्षा होती आणि प्रत्यक्षात बासष्ट सदस्यांनी हजेरी लावली. त्या वेळी रोजंदारी कामगार असलेल्या व्यक्तींनी आठ वर्षे चांगल्या वातावरणात शिस्तबद्ध रितीने काम केल्याने पुढे आयुष्य समाधानाने आणि यशस्वी पणे पार पडल्याचे सांगितले. दिलीप चव्हाण यांचा एक मुलगा अमेरिकेत आहे आणि दुसरा पुण्याला आय टी क्षेत्रात काम करत आहे. सर्वांना भेटल्याचे अत्यंतिक समाधान झाले.या उपविभागात अनेक वर्षे काम श्री. हनुमंत गुंजाळ,वय ८२ वर्षे,पुण्याहून आले होते.अक्षय प्रकाश योजनेत मोलाची कामगिरी बजावणारे आणि सिडको मध्ये नवी मुंबई मध्ये विमानतळ जमीन अधिग्रहण करण्यासाठी विशेष कामगिरी करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे श्री. दिवानजी पवार आवर्जून उपस्थित होते. श्री.प्रकाश भाटे आणि दिलीप चव्हाण यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम सुटसुटीत व देखणा केला.मोमेंटो म्हणून प्रत्येकाला लॅमिनेशन केलेला ग्रुप फोटो देण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रत्येकी पाचशे रुपये जमा केले होते.पुढील वर्षी याच दिवशी भेटण्याचे ठरले.








Post a Comment
0 Comments