Type Here to Get Search Results !

निमोण पंचायत समिती गणातून दत्तात्रय घोलप अपक्ष निवडणूक लढवणार!

 

संगमनेर (प्रतिनिधी )


संगमनेर तालुक्यातील तळेगाव–निमोण परिसरातील जनतेचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने मांडणारे आणि त्यावर उपाययोजना घडवून आणणारे पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी यंदा निमोण पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.


पत्रकार म्हणून कार्यरत असताना घोलप यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यात पुढाकार घेतला. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्गातील पारेगाव बुद्रुक ते काकडवाडी या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला, ही त्यांच्या कार्यशैलीची ठोस पावती मानली जाते.



तसेच लोणी–नांदूर–शिंगोटे महामार्गावरील तळेगाव दिघे गावाजवळील अरुंद पुलाचे बांधकाम, पिंपळे गावाजवळील पुलावरील कठड्यांचे दुरुस्तीचे काम, तसेच संगमनेर–कोपरगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी केलेला पाठपुरावा — या सर्व कामांत घोलप यांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे.



समाजातील विविध घटकांचे प्रश्न शासनदरबारी मांडून न्याय मिळवून देणे, अन्याय आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवणे या क्षेत्रातही त्यांनी सातत्याने काम केले आहे. समाजकारण हा केंद्रबिंदू ठेवून कार्य करणाऱ्या दत्तात्रय घोलप यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आता निमोण गणात असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यात पुढाकार घेणाऱ्या आणि समाजाभिमुख कार्य करणाऱ्या दत्तात्रय घोलप यांना या निवडणुकीत स्थानिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी जनतेतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Post a Comment

0 Comments