Type Here to Get Search Results !

मित्र नव्हे देव भेटला : डॉ. मैड परिवाराकडून पत्रकार राजूभाई पठाण यांना भावनिक वाढदिवस साजरा


 


राहाता शहरातील आरोग्यसेवेचे अधिष्ठान मानले जाणारे डॉ. मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गुरुवारी एका वेगळ्याच भावनिक क्षणाचा साक्षीदार ठरले. सुप्रसिद्ध डॉक्टर संतोष मैड आणि डॉ. आशुतोष मैड (छोटे सरकार) यांनी शहरातील पत्रकार राजूभाई पठाण यांचा वाढदिवस अतिशय आपुलकीने, प्रेमळ वातावरणात साजरा केला.


हॉस्पिटलमधील नर्सेस, ब्रदर्स, स्टाफ आणि सहकाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत "वाढदिवस साजरा" हा शब्दच अर्थपूर्ण करून दाखवला. रंगीत सजावट, माँगेनीज फ्लेवरचा स्वादिष्ट केक, सुंदर गुलदस्ते, शाल-मानपान आणि खास कैलास बोऱ्हाडे शैलीतील स्वागताने वातावरण प्रसन्न झाले.


डॉ. संतोष मैड सरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राजूभाईंना मिठी मारून पाठीवर हात ठेवला, तर डॉ. आशुतोष मैड यांनी अगदी छोट्या भावाप्रमाणे गळ्यात पडत मनापासून शुभेच्छा दिल्या — त्या क्षणी सर्वत्र एकच भावना होती, “आपुलकी म्हणजे काय, तर हीच!”


यानंतर कॅफे इंडियन फ्लेवरचे शिमॉन चुग यांनी खास लस्सी आणि अल्पोपहार देत उपस्थितांचे स्वागत केले. त्या दरम्यान सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे, आत्मीयतेचे भाव उमटले. काही वेळानंतर डॉ. संतोष मैड यांना आपत्कालीन उपचारासाठी ओटीकडे जावे लागले, मात्र त्यांच्या डोळ्यांतील आनंदाचे तेज तसचे राहिले.


डॉ. आशुतोष सरांसोबत झालेल्या दिलखुलास गप्पांमध्ये मैत्रीची खरी ओळख उमटली. परतीच्या वाटेवर राजूभाईंच्या मनात एकच विचार उमटला “लोक म्हणतात डॉक्टर हे देवरूप असतात,

पण मला तर मित्ररूपात देव भेटला.”


डॉ. मैड परिवाराच्या या अनोख्या, आपुलकीच्या स्नेहसोहळ्याने राहाता शहरातील नातेसंबंधांमध्ये माणुसकीचा सुवास पसरवला आहे.


खरेच, औषधांपेक्षा जास्त उपचारक असतो तो माणुसकीचा स्पर्श — आणि तो डॉ. मैड परिवाराकडून प्रत्येकाला मिळतो.

या वाढदिवस प्रसंगी डॉ संतोष मैड सर, डॉ आशुतोष मैड सर, डॉ कविता खांडरे, डॉ अभिषेक ठाकरे,डॉ दिपांजली ठोंबरे, डॉ यशवर्धन पितांबरे,कैलासभाऊ बोऱ्हाडे,सुधाकर पाटील ब्रदर, मंगेश पवार ब्रदर, राहुल तकवाल ब्रदर, ओमकार कडू ब्रदर, शुभम बोर्डे ब्रदर,सीमा बनसोडे सिस्टर, छाया शेळके सिस्टर, सविता पारखे सिस्टर, निकिता लोखंडे सिस्टर, दिव्या बोठे सिस्टर, अब्दुल सय्यद, ईश्वर गोडगे, जाकीर पिंजारी, आतिफ मन्सूरी, हर्षदा पाळंदे, तैमूर इनामदार, शुभम पवार, विजय पंडित,विष्णू सांबारे,ईश्वर मोईन, सोनू मेघाडे इतर मान्यवर व हॉस्पिटल चा सर्व स्टाफ उपस्थित होता

Post a Comment

0 Comments