Type Here to Get Search Results !

सहकारी दूध संस्था वाचवण्यासाठी दूध संघाने शेअर्स ला दहा टक्के लाभांश देण्यात यावा... भाऊसाहेब वाकचौरे

 


अकोले ( प्रतिनिधी) सहकारी दूध संस्था वाचवण्यासाठी दूध संघाने शेअर्स ला दहा टक्के लाभांश देण्यात यावा, शेअर्स कपाती ला मर्यादा  करण्यात यावी इतर कपाती बंद कराव्यात. तसेच दुधाला लिटर ला सरसगट एक रुपया कमिशन देण्याचा ठराव जयकिसान सहकारी दूध संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.

     कळस बु येथील जयकिसान सहकारी दूध संस्थेच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे हे होते. कळस सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, माजी सरपंच यादव वाकचौरे, शिवाजी वाकचौरे, सोसायटीचे संचालक बाजीराव वाकचौरे, अशोक वाकचौरे आदी उपस्थित होते.

       दूध संघ दर पगारातून शेअर्स अनामत कपात करते असे लाखो रुपये संघाकडे जमा असून त्याला संघ कुठल्याही प्रकारचा लाभांश देत नाही त्यावरती दहा टक्के लाभांश देण्यात यावा व या शेअर्स कपातीला काही मर्यादा घालण्यात यावी, दूध चढउतार निधी व संस्था विकास निधी कपात बंद करण्यात यावी. संस्थांना लिटरमागे  फक्त 40 पैसे कमिशन मिळते. त्यामध्येही आठ पैसे कापून घेतले जातात 32 पैशांमध्ये कुठल्याही संस्थेचे प्रशासनाचा खर्च सुद्धा भागत नाही, सचिवांचा पगार, लाईट बिल भरणे शक्य होत नाही. त्यामुळे या कपाती बंद कराव्यात व सरसकट एक रुपया कमिशन संस्थांना देण्यात यावे असा ठराव यावेळेस मंजूर करण्यात आला. संस्था विकास निधी कपात करीत असतानाही दूध संघ  मशीन दुरुस्त अथवा बाजारभाव संगणकाला भरण्याचे पैसे कपात करत आहे. ते  विनामोबदला करून देण्यात यावे असे ठराव मंजूर करण्यात आले.

        यावर्षी ओला दुष्काळ असल्याकारणाने चाऱ्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढ निर्माण झाला असून शेतकऱ्यांना दुधाचे रिबिट दोन रुपये देण्यात यावे असा ठराव संस्थेचे माजी चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली. बादशहा वाकचौरे, दशरथ ढगे, यांनी प्रश्न मांडले

     संस्थेचे व्हा. चेअरमन अशोक वाकचौरे यांनी स्वागत प्रास्तविक  व प्रोसडिंग वाचन सचिव मधुकर ढगे यांनी केले. आभार संचालक अनिल गवांदे यांनी मानले. यावेळी संस्थेचे संचालक अशोक वाकचौरे, मच्छिंद्र वाकचौरे, निवृत्ती मोहिते, संजय नवले, राजेंद्र कातोरे, रामनाथ ढगे आदी उपस्थित होते.


कोट:- सहकारी दूध संस्था अडचणीत असून या संस्था टिकल्यातर दूध संघ जगेल. खाजगी दूध संस्था च्या स्पर्धेत टिकायचे असेल संघाने संस्थांना मदत केली पाहिजे. मी दूध संघाच्या वार्षिक सभेत दुधाला लिटरला एक रुपये कमिशन मिळावे व शेअर्स ला लाभांश मिळावा असे मांडले होते. मात्र आता यासाठी दुग्धविकास मंत्री ना. अतुल सावे यांना भेटणार आहे.

श्री. भाऊसाहेब वाकचौरे 

चेअरमन, जयकिसान दूध संस्था, कळस

Post a Comment

0 Comments