संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कवठे धांदरफळ येथील प्रत्येकाच्या मनात घर केलेले व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी गणेश रामनाथ शिरसागर. यांचे काल मुंबई येथे उदयविकाऱ्याच्या झटक्याने निधन झाले. मुंबई पोलीस दलात ते क्राईम ब्रँच ऑफिसर पदावर कार्यरत होते यापूर्वी त्यांनी मुंबई पोलीस दलात अनेक महत्त्वपूर्ण पदावर आपली जबाबदारी पार पाडली.
सन 1994 बॅचमध्ये त्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सोबतच इतर राज्यांमध्ये देश सेवा केली ही देश सेवा करीत असताना त्यांनी पोलीस दलातील अनेक पद भूषवली आणि आपल्या कामाच्या जोरावर आपली एक विशिष्ट ओळख तयार केली मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणीही काम करीत असतानाही त्यांना आपल्या गाव बद्दल जिव्हाळा व प्रेम होते.
त्यांच्या अशा अचानक जाण्याने कवठे धांदर फळ व परिसरात दुःखाचे सावट निर्माण झाले आहे परिसरात त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आज त्यांच्यावर कवठे धांदरफळ अमरधाम येथे शासकीय इथमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अहिल्यानगर पोलीस दलाचे अधिकारी कर्मचारी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर त्याचप्रमाणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत दुःखद वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला

Post a Comment
0 Comments