Type Here to Get Search Results !

विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमितानेनमो युवा रन मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन

 अहील्यानगर दि.२५ प्रतिनिधी



विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमिताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नशा मुक्त भारताच्या निर्मितीसाठी नमो युवा रन मॅरेथाॅन स्पर्धेत जिल्हयातील युवकांनी आणि क्रीडा प्रेमीनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात सेवा सुशासन पंधरवडा आयोजित करून सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अहील्यानगर शहरात रविवार दिनांक २८सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले असून नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी हा संदेश देण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.


मॅरेथाॅनची सुरूवात माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होणार असून स्वस्तिक चौक आयुर्वेद महाविद्यालय काॅर्नर रिमांड होम,अंतिम चौक, दिल्ली गेट,न्यू आर्टस् महाविद्यालय,अप्पू हती चौक,सारडा काॅलेज पत्रकार चौकापासून येथून पुन्हा त्याच मार्गाने येवून मॅरेथाॅनची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.


या स्पर्धेत फक्त जिल्ह्यातील १४ वर्षावरील पुरुष आणि महीलांना सहभाग घेता येणार असून, दोन्ही गटातील विजेत्यांना रोख पारीतोषिक स्मृति चिन्ह देवून गौरविण्यात येणार असून स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.



नमो युवा रन मॅरेथाॅनची जय्यत तयारी भाजयुमोच्या वतीने करण्यात येत असून सर्वाधिक युवक आणि क्रीडा प्रेमींचा सहभाग यामध्ये असावा याकरीता जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना जिल्हा क्रीडा कार्यालय सेवाभावी संस्थांना सहभागी करून घेण्यात आले आहे.या जिल्हास्तरीय मॅरेथाॅन स्पर्धेत युवक युवतीनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments