अकोले ( प्रतिनिधी ) शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या राज्य संघटक पदी ह.भ.प. किशोर महाराज धुमाळ यांची निवड जाहीर केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष सचिव श्री. संजय मोरे यांनी पत्र देऊन निवड जाहीर केली आहे. व प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांची फेरनिवड झाली आहे.
शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा राज्यविस्तार झाला असून, महाराष्ट्रभरातील २०० पेक्षा अधिक साधुसंत व कीर्तनकार जोडले गेले आहेत. साधुसंतांची राजकीय पक्षाशी थेट समन्वय असणारी संघटना ठरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात वारकरी संप्रदायासह महानुभव, दत्त, शीख, गोसेवक तसेच इतर ५० पेक्षा अधिक संप्रदायांच्या उपक्रमांना सहाय्यभूत ठरणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्या प्रत्येक संप्रदायाशी अधिक घट्ट समन्वय साधण्यासाठी संघटना आहे. संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या वंशजांचाही या संघटनेत थेट सहभाग असून, हे पाऊल अध्यात्मिक क्षेत्रातील एक ऐतिहासिक पर्व ठरले आहे.
महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून निवड झालेले किशोर महाराज धुमाळ यांचा दांडगा जनसंपर्क व अध्यात्मिक क्षेत्रात योगदान आहे. ते अकोले येथील रहिवाशी आहेत. अगस्ती गुरुकुल शिक्षण संस्था आळंदी व संत रेडा महाराज वारकरी संस्था आळे चे अध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Post a Comment
0 Comments