Type Here to Get Search Results !

या वर्षाच्या शिवनीच्छल पुरस्कार माननीय विलास बडे स्वीकारणार

 *या वर्षाचा शिवनिश्चल पुरस्कार ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज’ मा.विलास बडे सर (News18 लोकमत) स्वीकारणार....*

नाशिक प्रतिनिधी


शिवनीच्छल सेवाभावी ट्रस्टर्फे वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात दरवर्षी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत शिवनीच्छल पुरस्काराचे वितरण करण्यात येते

यावर्षीचा प्रतिष्ठेचा शिवनीच्छल पुरस्कार न्यूज 18 लोकमतचे अँकर माननीय विलासराव बडे सर यांना घोषित झाला आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अँकरिंग मुळे त्यांनी सर्वांची मन जिंकून घेतली आहेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते

*15 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शिवनिश्चल मदतनिधी वितरण’ सोहळा पार पडणार आहे याचवेळी विलास बडे यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे*



*“आपण किती वेगाने धावतोय हे ‘महत्वाचे’ नाही*

*कोणत्या ‘दिशेने’ धावतोय हे महत्वाचे आहे….!”*

असे प्रतिपादन शिवव्याख्याते यशवंत गोसावी 

अध्यक्ष शिवनिच्छल सेवाभावी ट्रस्ट  यांनी केले आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी त्याचप्रमाणे शिवनिश्चल मदत वितरण निधी सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान शिवनीच्छल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांनी केले आहे


Post a Comment

0 Comments