Type Here to Get Search Results !

सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले यांची पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती

 संगमनेर प्रतिनिधी



संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगांव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष सहाय्यक फौजदार आदिनाथ रघुनाथ गांधले यांची नुकतीच सेवाजेष्ठतेनुसार पोलिस उपनिरीक्षक पदावर बढती झाली आहे.


गांधले यांनी गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात संगमनेर शहर, तालुका पोलिस स्टेशन, अकोले तसेच घारगांव येथे उल्लेखनीय सेवा बजावली आहे. पोलिस दलातील झुंजार, प्रामाणिक व तत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. गुन्ह्यांचा काटेकोर तपास करून आरोपींना जेरबंद करणे तसेच सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला आहे.


त्यांचा प्रवास पोलिस कॉन्स्टेबलपासून सुरू होऊन नाईक, हेड कॉन्स्टेबल, सहाय्यक फौजदार अशी पायरी-पायरी चढत अखेर उपनिरीक्षकपदी पोहोचला आहे. हा प्रवास त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.


त्यांच्या बढतीमुळे राहुरी तालुक्यातील वांबोरी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर ग्रामस्थ व नागरीकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments